जाणीवेतले क्षण ते हळवे
नकळत मन पुन्हा तिथे वळवे
नकळत मन पुन्हा तिथे वळवे
ओल्या दवबिंदू परी ते डोळे
टपोरे रेखीव तरी साधेभोळे
टपोरे रेखीव तरी साधेभोळे
गुलाबी मखमली तेजल त्वचा
जो तो घेई आनंदी मुका
जो तो घेई आनंदी मुका
होठ जणु कोमल कमळ
केश दाट जसे घनदाट हिरवळ
केश दाट जसे घनदाट हिरवळ
बंद पापण्या जणू सुंदर शिंपले
डोळयातले अश्रू भासे मोती आतले
डोळयातले अश्रू भासे मोती आतले
मज आपली आई म्हण, हि हाक देता
हास्य उमलले, तिच्या गालावरी बघता
हास्य उमलले, तिच्या गालावरी बघता
कोवळ्या या पाहुणी ने मज दिले
आईपण बालपण ममतेने बहरलेले
आईपण बालपण ममतेने बहरलेले
हृदयात खोलवर साठवून हे सारे
क्षण पुन्हा आठवते पाहताना तारे
क्षण पुन्हा आठवते पाहताना तारे
माया आभाळाची ते तारे जोपासताना
आईची उब बाळ स्तनपान करताना
आईची उब बाळ स्तनपान करताना
आगळे वेगळे निर्मळ हे नाते
माई न होताच केले मी व्यक्त ते
माई न होताच केले मी व्यक्त ते
-भाग्यश्री
Written १७/०१/२०२० १२.३१ pm
No comments:
Post a Comment