सावित्रीबाई फुले
जसे नाव तसेच व्यक्तीमत्व, सावित्री या नावाचा अर्थच आहे सुर्याची किरण,
देवी सरस्वती,
ज्ञानाची वाहणारी नदी।
जसे ज्योतीबा सुर्य, सावित्रीबाई प्रकाश किरण।
अज्ञानाचा अंधार पिटाळून लावण्यासाठी झिजले चंदनापरी,
ज्ञानाचा सुंगध दरवळुन केले समाजास साक्षर सुविचारी।
सावित्रीबाई यांनी स्वकष्टाने शिक्षण घेतले आणि आपल्या लेकी, भगिनींना देखिल हे सुख प्राप्त करून दिले। त्या काळी असंख्य विरोधाला तोंड देत स्त्री साक्षरतेचे महत्त्व सर्वांना पटवून दिले, त्या माऊलीच्या परोपकारी वृत्ती मुळेच आज मी हे लेखी मांडु शकते।
आजची स्त्री विविध क्षेत्रात जोमाने काम करत आहे। तिला पाठिंबा देणारे तिचे आजोबा,वडील, भाऊ, मित्र, पती, आणि सासरे हेच आहेत।
असाच एक क्षण माझ्या आयुष्यातही आला, आठविला असताना आंतर विद्यालयीन संगीत स्पध्रेत भाग घेण्यास निवड झाली आणि आमचा ग्रुपने प्रथम पारितोषिक मिळवले, प्रोग्राम संपवून घरी जाणार तेच माझे नविन घेतलेले बुट कोणी न्हेले आणि फाटके त्या जागी ठेवले। तेच घालून घरी आली, घरची परिस्थिती साधी राहणी, मन दुखी होते, आता शाळेत हे कसे घालून जाणार।
बाबांनी सारे ऐकून घेतले, मला जवळ घेत म्हणाले, पहिला नंबर आला ह्याचा आनंद साजरा कर। निर्जीव गोष्टी साठी लाख मोलाचा आनंद का गमवतेस। उद्या नविन बुट बक्षीस म्हणून लगेच घेतो। अशीच विविध स्पध्रेत भाग घेत रहा आणि यशस्वी हो। वस्तु ह्या वापरासाठी उपलब्ध असतात आणि क्षण हे मनमुराद जगण्यासाठी, भावना ह्या सजीव गोष्टीं साठी, बुट किंवा इतर अनेक निर्जीव गोष्टींसाठी नाही।
तो क्षण नेहमी स्मरणात राहीला। त्यांनी आणि आई ने नेहमीच शिक्षण घे व जी कला आवडते ती सुरू ठेव हे प्रोत्साहन दिले आणि अजूनही देत आहेत। तसेच लग्नानंतरही पती आणि वडील रुपी सासरे हे देखील प्रगत विचारी लाभले, हे नावा प्रमाणेच लाभलेले भाग्य आहे माझे।
धन्यवाद 🙏
दि. २२/१२/२०२०