हि वाट दुर जाते, ऊन सावली सह खेळत,
हिरवळ शाल पांघरून, दव बिंदू पानांच्या मिठीत,
ओली चिंब अवनी, सुगंधी लाल रंगात,
धुके धुंदीत येते, मोहिनी रानावनात,
वसे हवेत गारवा, ईथे गुलाबी ठंडीत
बहरलेली वनराई, आहे लाल डोंगरात
माणसे साधी भोळी, माझ्या मुक्त कोकणात
अशी सौंदर्याची खाण नाही गवसणार स्वर्गात
- भाग्यश्री
No comments:
Post a Comment